खाजगी, स्वतंत्र सेवा — ही शासकीय वेबसाइट नाही. Private, independent service — not a government website.आम्ही दर कसे तपासतो
सरकारी सेवक टूलकिट चिन्ह

सरकारी सेवक टूलकिट

महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी · HRPM INDUSTRIES

गट विमा योजना कॅल्क्युलेटर Group Insurance Scheme (GIS) Calculator

सदस्यत्वाचा दिनांक, 2026 मधील सदस्यत्व संपण्याचा महिना व मासिक वर्गणी भरून शासनाच्या 2026 तक्त्यानुसार बचत निधीची देय रक्कम काढा.

हे कसे काम करते / How it works

तुम्ही निवडलेला सदस्यत्वाचा दिनांक व 2026 मधील सदस्यत्व संपण्याचा महिना यांच्या छेदावरील रक्कम शासन तक्त्यातून घेतली जाते (सर्व 540 रकमा अधिकृत PDF शी तपासलेल्या). ती ₹60 वर्गणीसाठी असल्याने तुमच्या मासिक वर्गणी ÷ 60 (युनिट) ने गुणली जाते. मृत्यू झाल्यास मिळणारे विमा संरक्षण यात धरलेले नाही.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ

ही गणना कोणत्या नियमावर आधारित आहे?राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, 1982: 01.01.2026 ते 31.12.2026 या कालावधीत सदस्यत्व संपणाऱ्या कर्मचाऱ्यांना बचत निधीची देय रक्कम शासनाच्या अधिकृत परिगणितीय तक्त्यानुसार (प्रति ₹60 वर्गणी) — वित्त विभाग शा.नि. क्र. गविओ-1526/प्र.क्र.03/विमा प्रशासन, दि. 02.02.2026. बचत निधीवर 7.1% (तिमाही चक्रवाढ), विमा निधीवर 4%.
माझी वर्गणी सेवाकाळात बदलली असल्यास?हा कॅल्क्युलेटर संपूर्ण कालावधीसाठी एकच वर्गणी धरतो. वर्गणी बदलली असल्यास कार्यालय प्रत्येक कालावधीसाठी वेगळी गणना करते; अंतिम रक्कम कोषागार / कार्यालयाकडून निश्चित होते.
2027 मध्ये सेवानिवृत्त होणार असल्यास?हा तक्ता फक्त 2026 साठी आहे. 2027 चा तक्ता शासन नवीन शासन निर्णयाने जाहीर करते; तो आल्यावर हा कॅल्क्युलेटर अद्ययावत केला जाईल.
विमा संरक्षणाची रक्कम यात आहे का?नाही. ही फक्त बचत निधीची (व्याजासह) रक्कम आहे.
गट विमा योजना कॅल्क्युलेटर कशासाठी वापरतात?सदस्यत्वाचा दिनांक, 2026 मधील सदस्यत्व संपण्याचा महिना व मासिक वर्गणी भरून शासनाच्या 2026 तक्त्यानुसार बचत निधीची देय रक्कम काढा.
हा निकाल अधिकृत आहे का?हे साधन केवळ गणना व नियोजनासाठी सहाय्यक आहे. अंतिम निर्णयासाठी संबंधित शासन निर्णय (GR), परिपत्रक किंवा विभागीय आदेशानुसार अधिकृत माहिती तपासावी.
हा कॅल्क्युलेटर मोफत आहे का?हे साधन सरकारी सेवक टूलकिट अ‍ॅपमधील प्रीमियम विभागात उपलब्ध आहे.
चुकीचा किंवा अनपेक्षित निकाल आढळल्यास काय करावे?कृपया भरलेली सर्व मूल्ये पुन्हा तपासा आणि आवश्यक असल्यास अधिकृत संकेतस्थळावरील अद्ययावत दर व नियम पडताळा.
सरकारी सेवक टूलकिट

HRPM Industries, महाराष्ट्र यांचे खाजगी, स्वतंत्र टूलकिट. ही शासकीय वेबसाइट नाही.